Pimpri : हिरा बेगम यांच्या हस्ते सखी दिवाळी फेअरचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेतर्फे आयोजित केलेल्या सखी दिवाळी फेअर 2018 चे उद्घाटन माहेर संस्थेच्या श्रीमती हिरा बेगम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शेफाली बजाज आणि श्रीमती संतोष त्रिपाठी, संस्थेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश त्रिपाठी , संचालक कर्नल देशमुख , पंकज बल्लभ आदी उपस्थित होते. त्यामध्ये 80 STALL चा समावेश असून महिलांनी तयार केल्याल्या वस्तूं, सौंदर्य प्रसाधने, खेळणी, तोरण, पणत्या , आकाश कंदील, कपडे, दागिने, फराळाचे पदार्थ इ. समावेश असून खाद्यपदार्थांचाही आनंद घेता येणार आहे. हे प्रदर्शन 29 तारखेपर्यंत सर्वांसाठी संपूर्ण दिवस खुले राहील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.