Pune : टाकाऊपासून बनवलेल्या नाविन्यपूर्ण वस्तू मधून पर्यावरण रक्षणाचा संदेश

एमपीसी न्यूज – शाळेच्या, घराच्या परिसरात असलेल्या टाकाऊ वस्तूंपासून अतिशय आकर्षक अशा कलाकृती तयार करून पर्यावरणपूरक आणि हरित दिवाळी साजरी करण्याचा संदेश देणारे प्रदर्शन सूर्यदत्ता नॅशनल स्कुलमध्ये भरविण्यात आले आहे. यातून आपल्या आयुष्यात कलेला किती महत्व आहे, याची जाणीवही विद्यार्थी दशेतच व्हावी, यासाठी ‘वेळेचे महत्व’ या संकल्पनेवर हे कला प्रदर्शन भरविले आहे. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारित टाकाऊपासून उत्कृष्ट कलाकृतीची निर्मिती केली आहे.

विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या कला प्रदर्शनात उत्साहात सहभागी होत विविध कलाकृती तयार केल्या आहेत. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी अनुभवात्मक आणि आनंददायक शिक्षणासाठी कला एक अध्यापनशास्त्रीय साधन म्हणून वापरण्यावर भर देण्यास सांगितले. या कला प्रदर्शनात कचरा म्हणून गणल्या जाणार्‍या विविध वस्तूंचा कसा चांगला उपयोग करून उत्कृष्ट कलाकृती निर्माण करता येते हे या प्रदर्शनातून पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात दगडाचे युग ते चंद्रावर उतरण्यापर्यंतचा मनुष्याचा प्रवास उलगडला.

डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “दिवाळीच्या पूर्वसंध्येला टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या या कला प्रदर्शनातून दिवाळी अतिशय साध्या आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करावी, असा संदेश दिला आहे. सूर्यदत्ताच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील शिक्षण आणि व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ज्यामुळे विद्यार्थ्यांना एक परिपूर्ण शिक्षण आणि माहिती मिळेल. त्यामुळे विद्यार्थी उत्तम घडतील आणि समाजासाठी उत्कृष्ट कामगिरी करतील. समाज आणि औद्योगिक क्षेत्राच्या गरजेनुसार मनुष्यबळ विकसित करण्याचे सूर्यदत्ताचे ध्येय आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.