Chinchwad : तुलना करण्याने नाते-संबंधात वितुष्ठ येते – डॉ. संजय उपाध्ये

एमपीसी न्यूज – तुलना करण्याने घरात व नाते संबंधात वितुष्ठ निर्माण होते. आपल्या मुलांची इतर मुलांशी तुलना केल्याने मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. यातून आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे. घटस्फोटांचे वाढलेले प्रमाण हे पती-पत्नींनी इतरांशी तुलना केल्याचाच परिणाम आहे. त्यामुळे प्रत्येकाने तुलना करणे सोडावे. आपल्यातील अहंकार संपवून प्रेमाने वागावे, असे आवाहन ज्येष्ठ निरुपणकार डॉ. संजय उपाध्ये यांनी केले.

श्री गजानन महाराज (शेगांव) यांच्या 141व्या प्रगटदिनानिमित्त तानाजीनगर चिंचवड येथील श्री गजानन सत्संग मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी (दि.22) श्रींच्या गाभा-यात ‘बालाजी दर्शन’ हा आकर्षक देखावा करण्यात आला होता.

  • पहाटे श्रींना मधाचा अभिषेक करण्यात आला. दुपारी श्री कानिफनाथ, माऊली आणि वरदा महिला भजनी मंडळ यांनी भजन सादर केले. यावेळी निरुपण करताना डॉ. संजय उपाध्ये म्हणाले की, अहंमपणा दुर लोटून समोरच्या व्यक्तींचा मान ठेवला तर आपला अपमान होत नाही. मान अपमानाच्या नाट्यात वेळ व उर्जेचा अपव्यय होतो असेही डॉ. संजय उपाध्ये यांनी सांगितले.

गुरुवारी पहाटे 5.30 वाजता श्रींना केशर दुधाचा सामुदायिक अभिषेक करण्यात आला. दुपारी ज्ञानवर्धिनी श्री सुक्त, वरद, मुक्ताई या भजनी मंडळांनी भजन सादर केले. सोमवारी (दि. 25) सकाळी 9 वाजता ह.भ.प. अनंत महाराज शास्त्री दैठणकर (परभणी) यांचे किर्तन. दुपारी 11.45 वाजता श्रींची प्रगटवेळ व गजर, दुपारी 12 वाजता श्रींची महाआरती नंतर सायंकाळी 5 पर्यंत महाप्रसाद, रात्री 10.30 वाजता पसायदानाने महोत्सवाची सांगता होणार आहे.

  • कार्यक्रमांच्या आयोजनात श्री गजानन सत्संग मंडळांचे अध्यक्ष विश्वनाथ धनवे, उपाध्यक्ष किशोर कदम, कार्यवाह प्रताप भगत, सहकार्यवाह श्रीपाद जोशी, खजिनदार विष्णू पूर्णये, सहखजिनदार दत्तात्रय सावकार, सल्लागार रमाकांत सातपुते, श्रीकांत अणावकर, सभासद बाळकुष्ण मराठे, संजय खलाटे, देविदास कुलथे व गजानन भक्तगण व सेवेकरी यांनी सहभाग घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.