Pimpri : डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात मधुमेहींसाठी विशेष शिबिर 

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्र येथे स्वस्थवृत्त व योग विभागात दि. ८ जुलै ते २० जुलै या कालावधीत मधुमेह असणा-या रुग्णांसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात २५ ते ६० वर्षे वयोगटातील मधुमेह असणा-या व्यक्तींवर मोफत उपचार करण्यात येतील. उपचारांमध्ये औषधे मोफत देण्यात येतील. तसेच  प्रयोग शालीन तपासणी मोफत करण्यात येईल. ओ.पी.डी. क्रमांक ७ याठिकाणी तपासणी करण्यात येईल.

या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे. व या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9890355305, 9830769938, 9518748341 या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.