President Draupadi Murmu: द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाचा पिंपरी-चिंचवड येथेही जल्लोष

निगडी येथे भाजपाकडून पेढे वाटून जल्लोष साजरा

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड प्राधिकरण चिंचवड स्टेशन मंडळाच्या वतीने निगडी येथील लोकमान्य टिळक चौकात आज (शुक्रवारी) राष्ट्रपतीपदी श्रीमती द्रौपदी मुर्मू या भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल जल्लोषात त्यांचे अभिनंदन करण्यात आले. (Draupadi Murmu) यावेळी उपस्थितांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.

 

 

यावेळी अमित गोरखे म्हणाले की, अतिशय दुर्गम भागातील एक महिला उच्च पदावर विराजमान आहे ,हे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचे यश आहे. (President Draupadi Murmu) कुणालाही अपेक्षित नसलेले नाव भारतीय जनता पार्टीने द्रौपदीजींच्या नावाने पुढे आणले व आज त्या राष्ट्रपती म्हणून बहुसंख्य मतांनी निवडून आल्या आहेत हा संपूर्ण भारतातील महिलांचा व दुर्गम जमातीतील सर्व नागरिकांचा बहुमान आहे.

 

 

Pimpri News : पुण्यातील 90 वर्षीय महिला75 वर्षानंतर गेल्या आपल्या पाकिस्तानमधील घरी

 

 

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अमित गोरखे, माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, सुप्रिया चांदगुडे , विजय शंकर ,राजेंद्र बाबर, प्रतीक बेंद्रे ,सलीम शिकलगार, मनोज देशमुख ,माजी महापौर आर एस कुमार ,सूर्यकांत मोहिते, सचिन कुलकर्णी, कमलेश बहारवाल, कोमल शिंदे, राधिका बोरलीकर, दिपाली धानोरकर, दिपाली कारंजकर, मीनल दीक्षित, समीर जवळकर, शंकरराव किल्लेदार, यशवंत दनाने, मुकेश भाई चुडासामा ,चंद्रकांत धर्माधिकारी ,प्रकाश शिंदे ,सुरेश कारंडे ,जनार्दन पोलखडे, अरुण पाटोळे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.