Vilas Madigeri : अंतिम मतदार यादी प्रसिद्धीवरून पुन्हा निवडणूक विभागाचा भोंगळ कारभार

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक विभागाला 21 जुलै 2022 ही अंतिम मतदार यादी (Vilas Madigeri) प्रसिद्धीची मुदत होती. परंतु, पुन्हा महानगरपालिका निवडणूक विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला असून वेबसाईटवर मतदार याद्याच उपलब्ध करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे, असा आरोप भाजपचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी केला आहे.

या संदर्भात विलास मडिगेरी यांनी आज 22 जुलै रोजी मेलद्वारे भारत निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकरी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे.‌ त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतिम मतदार यादी पब्लिश करण्याच्या दिनांक 21 जुलै रोजी महानगरपलिका वेबसाइटवर दिसणे नियमानुसार आवश्यक होते. असे असताना आज सायंकाळी 6.40 वाजेपर्यंत प्रारूप मतदार उपलब्ध होती, पण अजिबात ओपन होत नव्हती. आणि 8 वाजून 5 मिनिटांनी प्रभागानुसार अंतिम मतदार नावांची यादी फक्त दिसत होती. पण तीही अजिबात ओपन होत नव्हती.

24 तास झाल्यानंतरही महापलिका वेबसाइटवर किंवा राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर पब्लिश झाले नाही. तसे, साईटवर आत्तापर्यंत दिसून येत नाही. दिवसभर खूप वेळा महानगरपलिका वेबसाइट उघडून पाहिली, तर ओपन होत नाही. सदर विषय गंभीर असल्याने या तक्रारीची दखल करून घ्यावी. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाच्या नियमांचा भंग झाला आहे हे स्पष्ट दिसून येत आहे. म्हणून आम्ही मुदतवाढ दया, म्हणून मागणी केली होती. या माझ्या गंभीर तक्रारीकडे सर्वांनी कानाडोळा करून दुर्लक्ष केले आहे. आज मतदार जाहीर करण्याच्या 24 तासानंतरही मतदार यादी जाहीर झाली नाही. हे अत्यंत चुकीचे आहे.

मतदार यद्यांचा संपूर्ण शहरामध्ये प्रचंड गोंधळ आहे आणि लाखों मतदारांच्या नावे सेक्शन हेडच्या अटीमुळे या संदर्भातील तक्रारी आहेत. यासाठी निष्पक्ष मतदार यादी तयार व्हावी, तसेच ज्या ठिकाणी जो मतदार राहतो आहे. त्याच्याकडे राहत्या पत्त्यावर अनेक वर्षापासून पुरावा आहे. ज्या हरकती सदर आहेत त्याला राहत असलेल्या प्रभागातील उमेदवाराला मतदान करण्याच्या हक्कापासून वंचित करण्यात येत आहे. तसेच, स्थानिक ज्या त्या प्रभगातील उमेदवाराला मतदान घेण्यापासून मनाई होत आहे. म्हणून 2 आठवडे मुदातवाढीची मागणी आम्ही सर्वांना केली होती. राज्य निवडणूक आयोग जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे.

Pcmc Election 2022 : अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध, रावेत प्रभाग सर्वांधिक मतदारांचा तर बापुजीबुवानगर प्रभागात सर्वात कमी मतदार

महानगरपालिका (Vilas Madigeri) आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर लेखी पत्र देऊन फोन करून प्रत्यक्ष भेटून विनंती केली. तरी या सर्वांनी माझ्या या गंभीर विषयी लक्ष देऊन मुदतवाढ मागणीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे. माझ्या प्रभागातील 6,755 मतदारांचे हरकती मुदतीत 3 जुलै रोजी दाखल केल्या होत्या. महानगरपालिका मिळकत कर बिल कॉपी 7105 एकूण पानांक व 3,550 पेज झेरॉक्स  हरकती बरोबर जोडली होती.

आज सायंकाळी 7.07 पर्यंत महानगरपालिका व राज्य निवडणूक आयोग या दोघांच्या वेबसईटवरून दिसून येत नाही. प्रशासनाचा भोंगळा कारभार यातून दिसून येत आहे. आयोगाच्या नियमांचा भंग झालेला आहे. तसेच, आम्ही दिलेल्या हरकतीप्रमाणे नावे योग्य त्या वॉर्डात बदल न झाल्यास या विरोधात मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात मतदार यादीवर वेगळी याचिका दाखल करावी लागेल, असे मडिगेरी यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.