Har Ghar Tiranga Abhiyan: ‘घरावर राष्ट्रध्वज फडकवा, तिरंगा मोहिमेला बळ द्या’, ऐतिहासिक कागदपत्रे शेअर करत पंतप्रधान मोदींचे आवाहन

13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत तुमच्या घरांमध्ये तिरंगा फडकवा असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे

एमपीसी न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपापल्या घरोघरी राष्ट्रध्वज फडकवून ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला बळ देण्याचे आवाहन केले आहे. (Har Ghar Tiranga Abhiyan) पंतप्रधानांनी ट्विट करत घरावर राष्ट्रध्वज  लावण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेमुळे आमचा तिरंग्याशी संबंध अधिक दृढ होईल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

22 जुलै 1947 रोजी तिरंग्याला राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आल्याचे प्रंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. ‘आम्ही वसाहतवादी राजवटीविरुद्ध लढत असताना स्वतंत्र भारताच्या ध्वजाचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वांचे धैर्य आणि प्रयत्न आज आम्हाला आठवतात. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांचा भारत घडवण्यासाठी आम्ही आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे

.Pune Kabbadi League: पुणे लीग स्पर्धेची महिलांमध्ये शिवनेरी जुन्नर व लयभारी पिंपरी चिंचवड संघात लढत

“यंदा आपण ‘आझादी का अमृत’ उत्सव साजरा करत असताना, ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला बळ देऊ या. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत तुमच्या घरांमध्ये तिरंगा फडकावा. (Har Ghar Tiranga Abhiyan) या मोहिमेमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी फडकवलेल्या पहिल्या तिरंग्याचे छायाचित्रही त्यांनी ट्विट केले. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू केली आहे.

 

मोदींनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आजच्या 22 जुलैला आपल्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. या दिवशी 1947 मध्ये आपला राष्ट्रध्वज स्वीकारण्यात आला होता. (Har Ghar Tiranga Abhiyan) आपली तिरंगा समिती आणि पंडित नेहरूंनी फडकवलेला पहिला तिरंगा यासह इतिहासाशी संबंधित काही मनोरंजक गोष्टी शेअर करत आहे.”

या संदर्भात गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ‘हर घर तिरंगा’मोहीम यशस्वी करण्यासाठी रविवारी सर्व राज्यपाल, नायब राज्यपाल, मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण बैठकही झाली.

सोशल मीडियावरही दिसणार तिरंगा

केंद्र सरकारने म्हटले आहे की, 22 जुलैपासून सर्व राज्य सरकारांच्या वेबसाइटच्या होमपेजवर राष्ट्रध्वज दिसेल. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर इत्यादी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिरंगा दाखवण्यासाठी सरकारकडून लोकांना प्रोत्साहित केले जात आहे. लोकांना तिरंग्यासोबत सेल्फीही घेता येणार आहे. ते सांस्कृतिक मंत्रालयाच्या वेबसाइटवर अपलोड केले जातील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.