Pune Kabbadi League: पुणे लीग स्पर्धेची महिलांमध्ये शिवनेरी जुन्नर व लयभारी पिंपरी चिंचवड संघात लढत

एमपीसी न्यूज:  राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी, बाणेर- बालेवाडी- सूस व म्हाळुंगे आणि बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने म्हाळुंगे- बालेवाडी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॉक्सिंग हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या पुणे लीग कबड्डी स्पर्धेच्या (Pune Kabbadi League) तिसऱ्या दिवशी झालेल्या महिला विभागात अत्यंत अटितटीच्या झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शिवनेरी जुन्नर संघाने लयभारी पिंपरी चिंचवड संघावर 51-50 अशा केवळ एका गुणाच्या फरकाने विजय मिळविला आहे.

 

 मध्यंतराला शिवनेरी जुन्नर संघाकडे 25-22 अशी आघाडी होती. हा सामना निर्धारीत वेळेत 45-45 अशा समान गुणांवर संपला. यानंतर हा सामना पाच पाच चढायांमध्ये खेळला गेला. (Pune Kabbadi League) पाच पाच चढाया मध्ये शिवनेरी संघाने बाजी मारत 6  गुण व लयभारी पिंपरी चिंचवड संघाने 5 गुण मिळविले. त्यामुळे शिवनेरी जुन्नर संघाचे51 तर लयभारी पिंपरी चिंचवड संघाचे 50 गुण झाले अवघ्या एका गुणाने लयभारी पिंपरी चिंचवड संघाला पराभव पत्करावा लागला.

 

 

शिवनेरी जुन्नर संघाच्या मंदिरा कोमकर व प्रतिक्षा कऱ्हेकर यांनी चौफेर चढाया करीत उत्कृष्ठ खेळ केला. तर दिव्या गोगावले व श्वेता माने यांनी चांगल्या पकडी घेतल्या. लयभारी पिंपरी चिंचवडच्या सलोनी गजमल व निकीता पडवळ यांनी चांगला प्रतिकार केला. तर ऐश्वर्या पऱ्हाड व कोमल आवळे यांनी चांगल्या पकडी घेतल्या.
लयभारी पिंपरी चिंचवड संघाला आता वेगवान पुणे व बलाढ्य बारामती संघ यांच्यातील विजयी संघाबरोबर खेळावे लागेल. यातील विजेता संघ अतिम सामन्यात खेळणार आहे. (Pune Kabbadi League) दुसऱ्या सामन्यात बलाढ्य बारामती संघाने वेगवान पुणे संघावर 42-35 अशी मात केली. मध्यंतराला बलाढ्य बारामती संघाकडे 24-22 अशी आघाडी होती. बलाढ्य बारामतीच्या आम्रपाली गलांडे हीने जोरदार खेळ करीत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाट उचलला. तर तृप्ती लांडगे हीने चांगल्या पकडी केल्या. वेगवान पुणे संघाच्या समृध्दी कोळेकर हीने चांगला प्रतिकार केला तर वैष्णवी लांडगे हीने चांगल्या पकडी केल्या.

 

बलाढ्य बारामती संघाला अंतिम सामन्यात जाण्यासाठी पहिल्या सामन्यातील पराभूत संघाशी म्हणजे लयभारी पिंपरी चिंचवड संघाशी खेळावे लागेल. महिला विभागात लयभारी पिंपरी चिंचवड व बलाढ्य बारामती यांच्यात अत्यंत अटितटीच्या झालेल्या सामन्यात लयभारी पिंपरी चिंचवड संघाने बलाढ्य बारामती संघावर 37-36 अशी अवघ्या एक गुणाने मात करीत अंतिम फेरीत शानदार प्रवेश केला. (Pune Kabbadi League) मध्यंतराला लयभारी पिंपरी चिंचवड संघ 18-15 अशा पिछाडीवर होता. लयभारी पिंपरी चिंचवडच्या सलोनी गजमल व निकिता पडवळ यांनी उत्कृष्ठ खेळ केला. तर कोमल आवळे हिने चांगल्या पकडी घेतल्या. बलाढ्य बारामतीच्या आम्रपाली गलांडे व हर्षदा हुंडारे यांनी जोरदार प्रतिकार केला. तर प्रतिक्षा लांडगे हीने सुंदर पकडी घेतल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.