Akurdi : ऐन सणांमध्ये आकुर्डीत 100 कुटुंबाचा वीजपुरवठा खंडित

एमपीसी न्यूज : महावितरणच्या गलथान कारभारामुळे
आकुर्डीमधील (Akurdi) कृष्णनगर भागातील सुमारे 100 कुटुंबांचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

सुवर्णयोग, शिवाई 2, जय योगेश्वर व नवनाथ या 4 हाउसिंग सोसायटींचा विद्युत पुरवठा आज दुपारपासून खंडित आहे. एक त्रस्त नागरिक म्हणाले की, “13 ऑगस्टला आमच्या भागातील ट्रान्सफॉर्मर ब्लास्टमुळे खराब झाला होता. त्यामुळे नवीन ट्रान्सफॉर्मवर बसवण्यात आला होता. अचानक दुपारी तीन वाजेच्या सुमारास महावितरणचे कर्मचारी आले व त्यांनी आमच्या येथील ट्रान्सफॉर्मर घेऊन गेले. त्यांनी त्या जागी दुसरा ट्रान्सफॉर्मर बसवला. तेव्हापासून आमच्या घरांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. आम्ही खूप वेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन केला, पण त्यांच्याशी संपर्क झाला नाही.

संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास संपर्क झाला व त्यांना आम्ही याबाबत सांगितले. ते नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणार आहेत, पण त्याला रात्रीचे बारा वाजू शकतात.”

एक त्रस्त गृहिणी म्हणाल्या की, “सध्या महानगरपालिकेकडून (Akurdi) दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे आज पाणीपुरवठा नाही. विद्युत पुरवठा नसल्याने मोटर पंप चालू शकत नाही. त्यामुळे सोसायटीमधील फ्लॅट्सला पाणीपुरवठा होऊ शकत नाही. आजूबाजूला सगळीकडे घरांमध्ये लाईट आहे, पण आमच्या घरात नाही. गणपती बाप्पाचे नैवेद्य करण्यासाठी सुद्धा पाणी नाही. या समस्येबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.