Bhausaheb Rangari Ganpati : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे ढोल ताशांच्या गजरात आगमन

एमपीसी न्यूज : ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’ गजरात, सनई व चौघड्यांची सुरावट, शंख नाद आणि ढोल ताशांचा जल्लोषपूर्ण निनाद आणि पारंपरिक रथ अशा उत्साही व मंगलमय वातावरणात हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपतीचे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाचे (Bhausaheb Rangari Ganpati) आगमन झाले.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटीलम्हणाले, 1892 पासूनची जुनी परंपरा असणारा, भारतातील पहिला सार्वजनिक गणपती असणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना आनंद होत आहे. स्वातंत्र्यपूर्ण काळात भाऊसाहेब रंगारी मंडळाने महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

दरम्यान सकाळी सव्वा नऊ वाजता बाप्पांची मिरवणूक मंडपातून सुरू होऊन श्री तांबडी जोगेश्वरी चौक, अप्पा बळवंत चौक मार्गे सकाळ कार्यालय मार्गे पुन्हा मंडपात आली. या मिरवणुकीतील रथाचे सारथ्य मंत्री पाटील यांच्यासह बालन दाम्पत्याने केले. यावेळी श्रीराम, कलावंत, चेतक, वाद्यवृंद, अभेद्य, समर्थ, जगदंब या ढोलताशा पथकांबरोबरच नगारा, सनई चौघड्याच्या मंगलमय सुरात, रथातून पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या मिरवणुक काढत श्रींची प्राणप्रतिष्ठापना (Bhausaheb Rangari Ganpati) करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.