Express Way : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी दोन तास ब्लॉक

एमपीसी न्यूज – मुंबई-पुणे दरम्यान असलेल्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती (Express Way)मार्गावर ग्रॅन्टी बसविण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक गुरुवारी (दि. 23) दुपारी बारा ते दोन या वेळेत घेतला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.

हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर किलोमीटर 35/500 येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. गुरुवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने मॅजिक पॉइंट किलोमीटर 42/100 येथून वळवून राज्य महामार्ग क्रमांक 48 जुना मुंबई पुणे महामार्गावरून खोपोली शहरातून शेडुंग टोल नाका येथे. अथवा खोपोली शहरातील इंदिरा चौकातून द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरून मुंबईकडे मार्गस्थ करण्यात येतील.

Bopkhel : दहा लाखांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी

तसेच पुण्याहून मुंबईकडे जाणारी(Express Way) हलकी वाहने व बसेस खोपोली एक्झिट किलोमीटर क्रमांक 39/800 येथून वळवून राज्य महामार्ग क्रमांक 48 जुना मुंबई पुणे महामार्गावरून खोपोली शहरातून शेडुंग टोल नाका येथे अथवा खोपोली शहरातील इंदिरा चौकातून द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरून मुंबईकडे मार्गस्थ होतील.

गॅन्ट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यावर दुपारी दोन वाजता द्रुतगती मार्गावरील पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान ब्लॉक कालावधीत वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाशी (9822498224) अथवा महामार्ग पोलीस विभागाशी (9833498334) संपर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.