Express Way : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर गुरुवारी दोन तास ब्लॉक

एमपीसी न्यूज – यशवंतराव चव्हाण पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर (Express Way )गुरुवारी (दि. 1) दुपारी दोन तास ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे.

द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत मुंबई (Express Way )वाहिनीवर कि.मी 56.900, कि.मी 63.000 व कि.मी 73.250 येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत केले जाणार आहे. गुरुवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत हे काम करण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी तसेच जड-अवजड वाहने) वाहतूक बंद राहील.

Pune : काही विचारसरणीचे लोक सतत नकारात्मक प्रचार करण्यात गुंतले -चंद्रकांत पाटील

वाहनाधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. पुणे ते मुंबई द्रुतगती मार्गावर किवळे पुलावरुन सर्व प्रकारची वाहने जुना मुंबई -पुणे मार्गाने मुंबईच्या दिशेने वळविण्यात येतील. तसेच जुना पुणे ते मुंबई मार्गाने येणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोलनाका येथून मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येणार आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.