Alandi : मेहनतीला पर्याय नाही.. ‘कष्ट करा , यश मिळवा’ – विजय नवले

एमपीसी न्यूज – इयत्ता 10 वी व 12 वी नंतर विद्यार्थ्यांपुढे कोणती (Alandi) शाखा निवडावी याबद्दल अज्ञान असल्यामुळे खूप संभ्रम वा दुविधा निर्माण होते. विद्यार्थ्यांची ही दुविधा वा संभ्रम दूर करण्याच्या उद्देशाने ‘व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त’ करियर मार्गदर्शन व समुपदेशन व्याख्यानाचे आयोजन श्री ज्ञानेश्वर विद्यालयात करण्यात आले.

Express Way : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर गुरुवारी दोन तास ब्लॉक

विजय नवले यांनी आपल्या व्याख्यानातून इयत्ता 10 वी, 12 वी व पदवीनंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, संरक्षण, उद्योग इत्यादी विविध क्षेत्रात उपलब्ध असलेल्या करिअरच्या संधी विषयी माहिती दिली. तसेच आपल्या आवडीनुसार योग्य करिअर निवड कशी करावी त्याचबरोबर आपल्या करिअर सोबत देशाचे करिअर कसे साधावे याची सांगड घातली.  मेहनतीला पर्याय नाही, ‘कष्ट करा ,यश मिळवा असा मोलाचा संदेश देऊन विद्यार्थ्यांस अभ्यास करण्यासाठी प्रेरित केले.

याप्रसंगी करियर मार्गदर्शक नारायण पिंगळे समवेत संजय उदमले, शशिकला वाघमारे, संजय कंठाळे, रामदास वहिले व इयत्ता 10 वी तील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित (Alandi) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.