Pune : पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे गोखले नगर येथे आयोजन

एमपीसी न्यूज – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि स्वंयभु फाउंडेशन यांच्या (Pune) संयुक्त विद्यमाने शहीद तुकाराम ओंबाळे मैदान गोखले नगर, छत्रपती शिवाजीनगर पुणे येथे शुक्रवारी (दि. 2 फेब्रुवारी) सकाळी 10 वाजता ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील विविध नामांकित उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला आहे. त्यांच्याकडून पाच हजारापेक्षा अधिक रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. या पदांसाठी किमान दहावी, बारावी, पदवीधर, पदव्युत्तर पदवी, कोणत्याही शाखेचा आयटीआय, पदविका, अभियांत्रिकी अशा विविध शैक्षणिक पात्रताधारकांना रोजगाराची संधी आहे.

Pune : काही विचारसरणीचे लोक सतत नकारात्मक प्रचार करण्यात गुंतले -चंद्रकांत पाटील

नोकरी इच्छुक उमेदवारांनी रिक्त पदांबाबत अधिक माहितीसाठी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने नोंदवावे. रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्ज व आधारकार्डाच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ, सरदार मुदलीयार मार्ग, पुणे येथे संपर्क साधून उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव (Pune) यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.