Chinchwad News : प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत 2 ऑक्टोबरपर्यंत वाढ

च-होली, रावेत व बो-हराडेवाडी येथील आरक्षित जागांवर 'सर्वांसाठी घरे' या संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे.

एमपीसी न्यूज – प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली असून अंतिम मुदत 2 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत केंद्रीय गृहनिर्माण व शहरी गरीबी निर्मुलन मंत्रालयाने राबवलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शन सुचनांचा अवलंब करुन च-होली, रावेत व बो-हराडेवाडी येथील आरक्षित जागांवर ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे.

या योजेनेसाठी 17 सप्टेंबर 2020 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार होते परंतु अर्जांसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करताना नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेऊन अर्ज भरण्याची मुदत 2 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविल्याचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.