Pimpri : राख्या देताहेत नेत्रदानाचा संदेश

एमपीसी न्यूज – श्रावण सुरु झाला की सणावारांना सुरुवात होते. नागपंचमी झाली की लाडक्या भाऊरायाच्या हातावर प्रेमाचा रेशमी धागा बांधण्यासाठी बहिणाबाईंची लगबग सुरु होते. रक्षाबंधनाचा सण काही दिवसांवर आला आहे. यासाठी दृष्टीहिन बांधवही राखी तयार करण्याच्या कामात मग्न आहेत. भाऊ बहिणीच्या नात्यांना घट्ट करण्यासाठी अंध मुलांचे हात सरसावले आहेत. त्यातून त्यांना रोजगार देखील मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या राख्यावर चिंचवडमधील आस्था दुकानातील विक्रेत्यांनी नेत्रदान हेच श्रेष्ठदान असा संदेश दिला आहे.

रक्षाबंधनाचा सण जवळ आला आहे. प्रत्येक बहीण आपल्या लाडक्या भावाच्या हातावर राखी बांधणार आहे. प्रेमाचा हा रेशीमी धागा हिंदू संस्कृतीत नातं घट्ट करणारा आणि रक्षणासाठी भाऊराया सक्षम असल्याची साक्ष देणारा ठरतो. मात्र हा रेशमी धागा आपल्या नात्या बरोबरच समाजाचे ऋण व्यक्त करणारा ठरला तर किती छान. पिंपरी-चिंचवड शहरात ‘आस्था’ नावाने तयार होणारा हा रेशमी धागा आता प्रत्येक बहिणीच्या पसंतीस उतरत आहे. ‘आस्था’ च्या प्रत्येक राखीवर सामाजिक भान ठेवत ‘नेत्रदान श्रेष्ठदान’ असा सामाजिक संदेश देण्यात येत आहे.

शहरात तयार होणारी ही राखी आता सर्वदूर पोहचली आहे. नेत्रदानांबाबत समाजात जनजागृती व्हावी यासाठी हा उपक्रम आठ वर्षांपासून राबविला जात आहे. दृष्टी नसली तरीही राखी बनविण्याचे प्रशिक्षण घेऊन त्यांना रोजगार उपलब्ध करुन दिला जात असल्याचे श्री महावीर राखीच्या संचालिका सीमा कुंकलोळ यांनी सांगितले. रक्षाबंधनाचा सण पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणासाठी काही हात वर्षभक्षर राबत असतात. शहरात चिंचवडमध्ये अनेक अंध बांधव या कामात व्यस्त आहेत. राख्यांना धागा बांधणे, बॉक्स बनविणे अशा विविध प्रकारची कामे दृष्टीहीन व गरजू महिला करीत आहेत. आत्मनिर्भर व्हावे यासाठी त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जात आहेत.

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.