Nishikant Kamat On Life Support: निशिकांत कामत यांची प्रकृती चिंताजनक, निधनाचे वृत्त चुकीचे

'Drishyam' director Nishikant Kamat on life support, fighting for life and death बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता-दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर पसरली होती.

एमपीसी न्यूज – दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या निधनाचे वृत्त चुकीचे असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेता रितेश देशमुख याने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असून सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत.

बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता-दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर पसरली होती. मात्र अभिनेता रितेश देशमुखनं निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर असून, तो अजूनही जिवंत आहे. त्यामुळं अफवा पसरवू नका, आपण त्यांची तब्येत लवकर ठीक व्हावी यासाठी प्रार्थना करूया असे ट्वीट त्याने केले आहे.

निशिकांत कामत यांना यकृताचा त्रास असून त्यांना 11 ऑगस्टपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.