Fasting Special Icecream:आषाढी एकादशीनिमित्त प्रथमच उपवास स्पेशल आईस्क्रीम, शारदा मस्तानीचा नवा ‘नॅचरल फ्लेवर’

Fasting Special Icecream: Fasting Special Ice Cream for Ashadi Ekadashi, Sharda Mastani's New 'Natural Flavor'

एमपीसी न्यूज –  तळेगाव दाभाडे शहरातील पहिले आईस्क्रीम उत्पादक आणि गेल्या 45 वर्षांपासून अविरत सुरु असलेल्या शारदा मस्तानी या स्थानिक उद्योजकांनी राज्यात प्रथमच उपवासाचे आईस्क्रीम तयार केले आहे. दूध, मलई, खडी साखर हे त्यातील प्रमुख घटक असून उपवासाला चालणारे ड्राय फ्रुटस तसेच कोणत्याही रंगाचा वापर त्यात केलेला नाही.

अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आणि  फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड अथोरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने प्रमाणित केलेल्या अन्न घटकांपासून ‘शारदा उपवास स्पेशल आईस्क्रीम’ तयार करण्यात आले आहे, अशी माहिती व्यवस्थापिका लक्ष्मी दिनेश कोतुळकर यांनी दिली.

हे आईस्क्रिम बनवताना त्याची स्पेशल बॅच करून हायजेनिक पद्धतीने ते तयार करण्यात आले आहे. सर्व पदार्थ ताजे आणि निवळ नैसर्गिक असल्याने आरोग्यासाठी सकस आणि चविष्ट उपहार असणार आहे. सध्याच्या परिस्थितीत पार्सल स्वरूपात ते उद्यापासून मिळणार असून चोखंदळ खवय्यांसाठी पर्वणी ठरेल, असा विश्वास लक्ष्मी कोतुळकर यांनी व्यक्त केला.

तळेगाव दाभाडे परिसरात होम डिलिव्हरीसाठी 9921997778 वर संपर्क साधता येईल, असेही त्यांनी सांगितले.

शारदा मस्तानी
वैद्य कॉलनी, नम्रता रॉयल बिल्डिंग, कलावती माता मंदिराशेजारी,
तळेगाव दाभाडे मो. 9921997778
“हमी शुद्धतेची, काळजी प्रत्येक ग्राहकाची!”

 

(जाहिरात पुरस्कृत लेख)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III