Pune: पुणे महापालिकेतील जनसंपर्क अधिकारी संजय मोरे सेवानिवृत्त

Pune: Sanjay More, Public Relations Officer, Pune Municipal Corporation, retired मोरे यांनी 21 वर्षे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले. या कालावधीत कोणतेही वादविवाद न करता काम करणे अवघड असल्याचे शेखर गायकवाड यांनी सांगितले.

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संजय मोरे मंगळवारी सेवानिवृत्त झाले. त्यांनी महापालिकेत तब्बल 36 वर्ष 9 महिने 28 दिवस काम केले.

मोरे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त एका छोट्या कार्यक्रमाचे महापालिकेच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी मोरे यांच्या पत्नी रंजना यांचा सत्कार केला. यावेळी विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, पत्रकार, महापालिका कर्मचारी उपस्थित होते.

मोरे यांनी 21 वर्षे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले. या कालावधीत कोणतेही वादविवाद न करता काम करणे अवघड असल्याचे शेखर गायकवाड यांनी सांगितले. मोरे यांनी त्यांच्या काळात चांगले काम केले. त्यांची कमी नेहमीच जाणवणार असल्याचेही आयुक्त म्हणाले.

माध्यमांचे स्वरूप आता बदलत आहे. त्यानुसार बदल करणे गरजेचे आहे. पुणे महापालिकेत 18 हजार कर्मचारी आहेत. या संस्थेत जन्मापासून मृत्यूपर्यंत काम होते. कोरोनाच्या संकट काळात सुद्धा मोरे यांनी रजा न घेता काम केले.

मागील 4 महिन्यांत ते खूपच ऍक्टिव्ह झाले होते. कंटेन्मेंट झोनमध्ये जाऊन सुद्धा त्यांनी काम केल्याचे रुबल अग्रवाल म्हणाल्या. पुणे महापालिकेचा जनसंपर्क विभाग अद्ययावत करण्यात मोरे यांचा मोलाचा वाटा आहे. स्वाईन फ्लू आणि आता कोरोनाच्या काळात काम करताना खूप काही शिकायला मिळाल्याचे संजय मोरे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.