Pimpri : सेवापूर्तीनिमित्त शरद भोंडवे यांचा सत्कार 

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसचिव विभागातील कर्मचारी शरद भोंडवे 31 मे 2019  रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याबाबत भोंडवे यांचा नगरसचिव विभागाच्या वतीने  स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

नगरसचिव विभागातील कर्मचारी कार्यतत्पर असल्याने नगरसचिव विभाग हा कार्यक्षम विभाग म्हणून महापालिकेत ओळखला जातो. तसेच या विभागातील कर्मचारी प्रामाणिक व दिलेली कामे वेळेत पूर्ण करीत असल्यामुळे महापालिका सभांचे कामकाज सुलभतेने होत आहे, असे विलास मडिगेरी म्हणाले.

नगरसचिव उल्हास जगताप यांनी मनोगत व्यक्त करताना नगरसचिव विभागातील व पदाधिका-यांकडील  कार्यालयातील प्रत्येक कर्मचारी प्रामाणिकपणे करीत असल्यामुळे माझ्याकडे कुठल्याही पदाधिका-यांची तक्रारी येत नाहीत. पदाधिकारी, नगरसदस्य  व नगरसचिव कार्यालय  यांच्यातील दुवा म्हणून काम करीत असलेल्या कर्मचा-यांच्या योग्य समन्वयामुळे नगरसचिव कार्यालयाचा कामकाजाच्या बाबतीत नांवलौकीक आहे. यावेळी नगरसचिव विभागाचे संजय राऊत, प्रिती देवकर व सुप्रिया सुरगुडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी वरीष्ठ लिपिक प्रकाश बने, ज्ञानेश्वर पिंगळे, सुधिर मरळ यांच्यासह नगरसचिव कार्यालयातील कर्मचा-यांनी शरद भोंडवे व त्यांच्या कुटूंबीयांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  शिल्पा निफाडकर  यांनी केले. उपनगरसचिव अरुण जागडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.