Kasarwadi News : कासारवाडीतील ‘असामान्य’ महिलांचा गौरव

एमपीसी न्यूज – ज्या महिला कासारवाडीत 50 वर्षांपेक्षा अधिक काळापासून अभिमानाने वास्तव्यास आहेत, त्याचप्रमाणे कोविड योद्ध्या महिला व उत्कृष्ठ विद्यार्थिनींचा नुकताच कासारवाडी सिटीझन फोरमतर्फे नुकताच सत्कार करण्यात आला.

कासारवाडीतील अशोका हॉटेल येथे झालेल्या कार्यक्रमाला माजी महापौर योगेश बहल, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, माजी नगरसेविका आशा शेंडगे, माजी नगरसेवक श्याम लांडे, जितेंद्र ननावरे, विश्वास लांडगे, लहु लांडगे, राज्य सरकारचे अधिकारी नवीन बो-हाडे, टीव्ही कलाकार संदीप साकोरे, विद्यापीठ अधिकारी सुनील म-हाळे, जयंत करिया, श्रीधर चालका आदी उपस्थित होते.

कासारवाडीची संस्कृती जतन केली. आजपर्यंतचे आयुष्य या परिसरात घालविले. नवीन पिढी घडविली. सर्वांसमोर आदर्श ठेवला अशा जयश्री मरळे, मालती काळे, मीनाताई चोरडिया, अलका लांडगे, पद्मजा बोरा, विमल मोरे, कांता राक्षे, यशोदा भोसले, इंदुबाई लांडगे, निर्मला निंबाळकर, मीरा लांडगे, तेरेजा लोखंडे, कौशल्या ढमाले, बनसोडे काकू, रत्नप्रभा माने आणि विमल घोडके या महिलांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कोविड योद्धा म्हणून नर्स शोभा थोरात, शिल्पा पळसकर, प्राजक्ता काळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उत्कृष्ठ विद्यार्थींनीमध्ये वैष्णवी घोडे, पुजा, आकांक्षा यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना माजी महापौर योगेश बहल म्हणाले, ”कासारवाडीतील ज्येष्ठ महिलांनी एक आगळीवेगळी परंपरा जपली. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी आपल्या परिवारास एकजूट ठेवले. नवीन पिढी घडविली. तीच नवीन पिढी आज अनेक क्षेत्रात उत्कृष्ठ काम करत आहे. पिंपरी-चिंचवड आणि देशाच्या प्रगतीस हातभार लावत आहे. कासारवाडीतील ज्येष्ठ महिलांनी विशेष जे प्रेरणादाई काम केले आहे. त्याचा बोध शहरातील इतर महिलांनी घ्यावा”.

माजी नगरसेविका सीमा सावळे म्हणाल्या, ”कासारवाडीतील ज्येष्ठ महिला यांनी 50 वर्षात जे कठीण प्रसंग भोगले. त्याच्यावर मात करुन नवीन अध्याय रचला. हे वाखणण्याजोगे आहे. चाळीतल्या एका खोलीत राहून जिथे स्वच्छतागृहाची सुविधा नाही. कौलाचे घर अशा अतिशय अवघड परिस्थिती राहून देखील त्यांनी कधीच चुकीचे पाऊल उचलले नाही. त्यांची ही जीवनयात्रा पाहून अतिशय प्ररेणा आणि स्फुर्ती मिळते. या सर्व महिलांना माझा सलाम”…

यावेळी बोलताना फोरमचे समन्वयक मनोज मोरे म्हणाले, ”माझे लहानपण कासारवाडीत गेले. माझ्या आजूबाजूला असंख्य कष्टाळू महिला होत्या. त्या महिलांनी आज 75 आणि 80 व्या वर्षात पदार्पण केले. मी त्यांना कधीच चुकीचे वागताना किंवा बोलताना बघितले, ऐकले नाही. महागडी साडी, चित्रपट, फिरायला जाण्याचा हट्टास कधीच केला नाही. पतीच्या अतिशय कमी पगारात त्यांनी आपला संसाराचा गाढा पुढे नेला. माझ्यासाठी त्या नेहमी प्रेरणादाई राहिल्या आहेत. मी कधीही वैष्णोवदेवी, महालक्ष्मी किंवा इतर कोणत्याही मंदिरात गेलो नाही. कारण, माझ्या अवती-भवती या महिलांचे देवाच्या रुपात अस्तित्व होते. मी परत जन्म घेईत तर कासारवाडीतच. परंतु, आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे. नवविवाहित महिला विविध मांगण्यासाठी पतीसोबत भांडणे करतानाचे चित्र दिसते. आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेत नाहीत अशी खंतही त्यांनी बोलवून दाखविली”.

कोविड योद्धा शोभा थोरात यांनी 6 महिने अतिदक्षता विभागात कोरोनासोबत झुंज देऊन त्यावर मात केली. कोविड योद्धा शिल्पा पळसकर यांनी आपल्या कोरोनाग्रस्त आईसाठी जीवाचे रान करून आयसीयूमध्ये धीर देत आईला वाचवण्यासाठी अविरत  केला.  कोविड योद्धा प्राजक्ता काळे- कासारवाडीतील पहिल्या महिला प्लाझ्मा डोनर ठरल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.