Fighter jets News : लढाऊ विमानांची हवेमध्ये टक्कर; एका वैमानिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात भारतीय हवाई दलाची दोन लढाऊ विमानांची टक्कर होऊन दुर्घटना (Fighter jets News) घडली. या दुर्घटनेत एका वैमानिकाचा मृत्यू झाला .

शनिवारी पहाटे भारतीय हवाई दलाच्या सुखोई-30 एमकेआय ’ आणि ‘मिराज-2000’ या दोन दोन लढाऊ विमानांनी नियमित प्रशिक्षणासाठी ग्वाल्हेर हवाई तळावरून उड्डाण केले.उड्डाणानंतर दोन्ही विमानांची हवेमध्ये टक्कर झाली. य़ा दुर्घटनेत मिराज-2000’चे वैमानिक विंग कमांडर हनुमंत राव सारथी या वैमानिकाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला.

Mughal Garden News : आता नवीन नावाने ओळखलं जाणार राष्ट्रपती भवन परिसरातील ‘मुघल गार्डन’

‘ सुखोई-30 एमकेआय ’ या विमानाच्या दोन वैमानिकांनी आपत्कालीन मार्गाचा अवलंब करून सुटका करून घेतली.अपघातामागील कारण, दोन्ही विमानांचे ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतरच सांगता येईल,,असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट (Fighter jets News) केले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना या अपघाताची घेतली आहे.कमांडर सारथी यांच्या निधनामुळे खूप दु:ख झाले. त्यांच्या शोकाकुल कुटुंबाप्रति मी संवेदना व्यक्त करतो. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे आहोत,असे राजनाथ सिंह यांनी यावेळी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.