Chikhli News : चिखलीमधील कुदळवाडी भागात मंगळवारी पहाटे ट्रान्सफॉर्मला आग

एमपीसी न्यूज – चिखलीमधील कुदळवाडी भागात मंगळवारी पहाटे ट्रान्सफॉर्मला आग लागल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पिंपरी मुख्यालयाने सांगितले की, आज पहाटे 3:36 वाजता फोनवरून धनंजय जगताप यांनी कळवले की, कुदळवाडी पोलीस चौकीजवळ इलेक्ट्रिक पोलला शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे.एक अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवण्यात आला होता पण तो तिथे पोहोचण्यापूर्वीच आग विझवली होती.

जागृक नागरिक धनंजय जगताप यांच्याशी संपर्क सल्ला असता ते म्हणाले की, ” मी कुदळवाडीमध्ये रीगल रेसिडेन्सी सोसायटीमधील एका बिल्डिंगच्या 11व्या मजल्यावर राहतो. पहाटे ट्रान्सफॉर्मरच्या येथून  शॉर्टसर्किटमुळे झालेल्या स्पार्किंगचा मोठा आवाज येत होता. त्यामुळे मी याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवले.”

ते म्हणाले की, “थोड्या वेळाने संपूर्ण भागामधील विद्युत पुरवठा 15 ते 20 मिनिट खंडित केला गेला होता.त्यामुळे मी अग्निशमन विभागात कळले की आग विझली आहे.त्यानंतर विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला होता.मला वाटते कुणीतरी महावितरणला या आगीबद्दल कळवले होते.त्यामुळे महावितरणमार्फत विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता व त्यांनी तेथे दुरुस्ती करून विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत केला होता.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.