Ravet : आगीत स्कूल बस जळून खाक

एमपीसी न्यूज – शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत स्कूल बस जळून खाक झाली. ही घटना आज (शनिवारी) रावेत येथे घडली.

रावेत येथील एस.बी.पाटील स्कूलच्या पार्किंगमध्ये (एमएच 14 सी डब्ल्यू 3373) या क्रमांकाची स्कूल बस उभी होती. सकाळी शॉर्टसर्किटमुळे बसला अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच निगडी, प्राधिकरण अग्निशामक केंद्राचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविले. यामध्ये बस जळून खाक झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.