Inter College Chess Competition: आंतर महाविद्यालय बुद्धिबळ स्पर्धेत पीसीसीओई संघाचा प्रथम क्रमांक

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती (Pune District Divisional Sports Committee) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (PCCOE) निगडी येथे आंतर महाविद्यालय बुद्धिबळ मुले व मुलींच्या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) मुलांच्या संघाने एकूण 22.5 गुण मिळवून सांघिक विजेतेपद पटकावले. तर मुलींमध्ये इंदापूर येथिल कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने विजेतेपद मिळविले.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माजी शारीरिक शिक्षण संचालक प्रा. शकूर सय्यद व प्रा. प्रमोद शिंदे तसेच पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सहसचिव डॉ. आशिष तळेकर, पीसीसीओई चे एस. डी. डब्ल्यू. डीन डॉ. प्रवीण काळे उपस्थित होते.

Tripurari Paurnima : गोगावले मठ येथे त्रिपुरारी पौर्णिमा, तुलसी विवाह व अन्नकोट सोहळा उत्साहात साजरा

या स्पर्धेमध्ये एकूण 182 मुले व 75 मुली खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास पीसीसीओई चे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव डॉ. सुहास बहिरट, सहसचिव डॉ. आशिष तळेकर, कॅम्पस इन्चार्ज देवकर व डॉ. अजय गायकवाड उपस्थित होते. स्पर्धेचे नियोजन व आयोजन पीसीसीओईचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संतोष पाचारणे यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष, ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कोषाध्यक्ष शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, नरेंद्र लांडगे, धनंजय काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी स्पर्धेतील विजयी संघांना व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

स्पर्धेचा निकाल

सांघिक (मुले) :-

प्रथम क्रमांक :- पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी

द्वितीय क्रमांक:- राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, ताथवडे

तृतीय क्रमांक :- आय स्क्वेअर आयटी महाविद्यालय, हिंजवडी

सांघिक मुली :-

प्रथम क्रमांक :- कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, इंदापूर

द्वितीय क्रमांक :- एमआयटी महाविद्यालय, आळंदी

तृतीय क्रमांक :- सी. टी. बोरा महाविद्यालय, शिरूर

वैयक्तिक प्रकार निकाल

मुले

1. देशपांडे अथर्व – टी. एस. एस. एम., नऱ्हे

2. पाटील हर्षल – शरदचंद्रजी पवार महाविद्यालय, जेजुरी

3. तेलंग यशवंत- पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी

4. शेळके संकर्ष – पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, निगडी

5. कांत स्वप्निल- सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स, आंबेगाव

6. गोडबोले रौनक – राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, ताथवडे.

मुली :-

1. खंडागळे यशकीर्ती- कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, इंदापूर

2. वाळुंज श्रुती – डॉ. डी वाय पाटील महाविद्यालय, लोहगाव

3. शेरकर वैष्णवी – डॉक्टर डी. वाय. पाटील महाविद्यालय, आकुर्डी

4. काळे साक्षी- सी. टी. बोरा महाविद्यालय, शिरूर

5. बेलोटे तृप्ती – सी. टी. बोरा महाविद्यालय, शिरूर

6. धर्माधिकारी वैदेही – एस. ए. ई. कोंढवा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.