Tripurari Paurnima : गोगावले मठ येथे त्रिपुरारी पौर्णिमा, तुलसी विवाह व अन्नकोट सोहळा उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – पुण्यातील मंगळवार पेठ येथील श्री स्वामी समर्थ गोगावले मठ (shri samarth gogavale math) येथे सोमवारी (दि.7) सायंकाळी एकाच दिवशी त्रिपुरी पौर्णिमा (tripuri paurnima), तुलसी विवाह (Tulsi Vivah),दीपोत्सव (deepotsav) व अन्नकोट सोहळा (annakot sohala) मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या वर्षी या सोहळयाला 21 वर्षे पूर्ण झाली आहेत.तुलसी विवाहानंतर (tulsi vivah) मठांत सर्वत्र पणत्या लावून दीपोत्सव आरास करण्यांत आली.त्यामुळे मठ परिसर हा उजळून निघाला होता. तसेच भक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांना नैवेद्य म्हणून आणलेल्या अनेकविध तिखट, गोड पदार्थांचा अन्नकोट केला गेला.

Battle of Palkhed : अनुभवा पालखेडची जगप्रसिद्ध लढाई

या सोहळ्यात खरी रंगत आणली ती अथर्व बोत्रे यांनी स्वामी महाराजांसमोर केलेल्या बासरी वादनाने. सर्व उपस्थ भक्त त्या सुरात हरकून गेले होते. त्यानंतर साडेसात वाजता श्री स्वामी महाराज यांची आरती केली गेली. यावेळी दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी होती. शेजारती नंतर अन्नकोट मधील नैवेद्य पदार्थ भक्तांना प्रसाद म्हणून वाटप केले गेले.येत्या 2023 या वर्षी गोगावले मठांस 50 वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमीत्ताने मठात अनेकविध कार्यक्रमांद्वारे हा सुवर्ण महोत्सव साजरा केला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.