Pune : शाळांत मराठी भाषेची सक्ती केल्याने मराठी वाढणार – रमेश बागवे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून आज प्रथमच सर्व भाषेतील शाळांत मराठी भाषेची सक्ती केली आहे. त्यामुळे मराठी भाषा वाढणार असल्याचे मत काँगेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केले.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी काँग्रेस भवन येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी सरस्वतीच्या प्रतिमेस रमेश बागवे व प्रा. विकास देशपांडे यांनी पुष्पहार अर्पण केला.

रमेश बागवे म्हणाले, इतर भाषांचा दुजाभाव मी करीत नाही. पण, आपली मायभाषा सर्व कुटूंबात बोलली जाणे, लिहिली जाणे हे महत्वाचे आहे. जागतिक व्यवहारासाठी इंग्रजी भाषा ही आली पाहिजे. परंतु, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांनी मराठी भाषेचे वर्णन मातेच्या दुधाप्रमाणे केले आहे. म्हणूनच आपल्या मुलांचे शिक्षण मराठी भाषेत झाले पाहिजे, या मताचा मी आहे.

प्रा. विकास देशपांडे यांनी आपल्या भाषणात मराठी भाषा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरापासून सर्वमान्य व सर्वश्रूत झाली. या विषयावर व्याख्यान दिले. सेवादलाचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी आभार मानले. यावेळी शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी, रमेश सकट, सुनील घाडगे, रमेश सोनकांबळे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.