Nigdi : आयटी निरीक्षकांकडून डॉक्टरची आठ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – आयटी निरीक्षकाने त्याच्या साथीदारांसोबत मिळून एका डॉक्टरची 7 लाख 90 हजार 47 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार एप्रिल 2018 पासून 9 ऑगस्ट 2018 दरम्यान निगडी येथे घडला.

डॉ. विकास सीताकांत साळस्तेकर (वय 61, रा. पालवी बंगला, सेक्टर 27, प्लॉट नंबर 232, प्राधिकरण) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार स्नेहा सिंग, रूपा तोमर, राजू वर्मा, सुनील गोयल, झा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा आणि रूपा या आयटी इन्स्पेक्टर आहेत. राजू आणि सुनील आयटी ऑफिसर आहेत. स्नेहा आणि रूपा यांनी एप्रिल 2018 महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून डॉ. विकास यांच्या वडिलांच्या नावावर असलेले प्रॉव्हिडंट फंडचे 3 लाख 10 हजार 990 रुपये त्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे सांगितले. मात्र ही रक्कम काढण्यासाठी वेगवेगळ्या कारणांसाठी पैशांची मागणी केली. डॉ. विकास यांनी स्नेहा आणि रूपा यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँकेच्या खात्यावर 4 लाख 79 हजार 57 रुपये एनईएफटीद्वारे जमा केले. मात्र त्यांना प्रॉव्हिडंट फंडची रक्कम परत मिळाली नाही. यातून डॉ. विकास यांची 7 लाख 90 हजार 47 रुपयांची फसवणूक झाली. यावरून आरोपींविरोधात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.