Pune Crime News : लग्नाचे अमिष दाखवून शरीरसंबंध ठेवणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल; फरार आरोपीस लातूर येथून घेतले ताब्यात: म्हाळुंगे पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज –  लग्नाचे अमिष दाखवून शरीरीक संबंध ठेवणाऱ्या एकाला म्हाळुंगे पोलिसांनी (Pune Crime News) लातूरमधून अटक केली.  भगवान बिरादार असे आरोपीचे नाव आहे. 

 

याबाबत सविस्तर माहिती अशी –  पीडित महिले सोबत कंपनीमध्ये (Pune Crime News) काम करणारा भगवान बिरादार याने पीडित महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिचे सोबत जुलै 2020 पासून शरीरसंबंध ठेवले व तिचे सोबत लग्न न करता दुसरे स्त्री सोबत लग्न ठरविले. याबाबत पीडित महिला जाब विचारण्यासाठी गेली असता तिला मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केल्याने तिने दिलेल्या तक्रारीवरून चाकण पोलिस ठाण्याच्या अंकित म्हाळुंगे चौकी येथे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News : पोलिसांनी केली अवघ्या 12 तासांत चोरट्यांना अटक

 

म्हाळुंगे पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांनी लगेच आरोपीचे शोधाकरिता दोन पथक तयार केले व आरोपीचे पुणे येथील त्याच्या राहत्या घरी व मूळ गावी शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

पोलिस पथक त्याच्या शोधाकरिता रुपीनगर येथे गेले असता पोलिस (Pune Crime News) शोधत असल्याचे समजल्याने तो तेथून फरार झाला.

तांत्रिक तपासाचे आधारे शोध घेत असताना त्याला लातूर येथील जवळगा साकोळ येथून ताब्यात घेऊन 29 जूनला रात्री 11.35 वा अटक करण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.