Pune Crime News : पोलिसांनी केली अवघ्या 12 तासांत चोरट्यांना अटक

एमपीसी न्यूज – कंपनीच्या कामगाराला लुटणार्या 2 चोरट्याने म्हाळुंगे पोलीसांनी (Pune Crime News) अवघ्या 12 तासांत अटक केली. दिपक नेटके (वय 29,रा. मेदनकरवाडी ता. खेड) व सौम्यरंजन शाहो (वय 25. रा. मोशी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी – श्रीनिवास गायकवाड हे 28 जून रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास कंपनी सुटल्यावर घरी पायी निघाले होते.त्यावेळी दूचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी गायकवाड यांना चाकूचा धाक दाखविला आणि त्यांच्याकडील पाच हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने पळवून नेला.त्यानंतर गायकवाड यांनी म्हाळूंगे पोलीसात तक्रार दिली.

 

Todays Horoscope 1 July 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

 

म्हाळूंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद पवार यांच्या (Pune Crime News) सूचनेनुसार उपनिरीक्षक दिनेश चव्हाण यांनी पोलीस अंमलदार हनुमंत बांगर व अमोल वेताळ यांच्यासह साध्या वेषात आरोपींचा शोध सुरु केला असता वोक्सवॅगन कंपनी ते महिंद्रा कंपनी या रोडवर मोटरसायकलवरील दोघेजण रस्त्याने येणारे जाणारे लोकांची संशयितरित्या टेहळणी करीत असल्याबाबत वेताळ यांना बातमी मिळाली.

चव्हाण व स्टाफ चौकशी करिता त्यांच्याकडे जात असताना पोलिस येण्याची(Pune Crime News) चाहूल त्यांना लागली. दोघे संशयित महिंद्रा कंपनीचे दिशेने मोटर सायकलवरून पळून जाऊ लागले.

 

Maharashtra CM : उद्धव ठाकरे यांनी दिल्या एकनाथ शिंदे यांना सदिच्छा!

 

 

त्यांनी कॅपिटल सिटी सोसायटी येथें मोटरसायकल थांबावली तेव्हा मागे बसलेला संशयीत सोसायटीच्या पार्किंगकडे पळत जाऊन लपून बसला.

स्थानिक लोकांच्या मदतीने पकडून पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने दोघांना 29 जूनला रात्री 11.30 वा अटक करण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.