गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022

Gahunje : बिस्किटाचे भांडण पोलिसांच्या मध्यस्थीनेही सुटेना; अखेर पाच जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बिस्किटाचे पूर्ण पैसे (Gahunje) दिले नाहीत म्हणून भर रस्त्यात पाचजण भांडत होते. बरं घटनास्थळी पोलीस आले, त्यांनी मध्यस्थी केली, तरी भांडण सुरूच..मग काय पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आणि थेट गुन्हा दाखल केला. ही घटना गुरुवारी (दि. 22) रात्री साईनगर, गहुंजे येथे घडली.

पोलीस उपनिरीक्षक मारोती मदेवाड यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फुलताज पन्नू खान (वय 18), राहुल पन्नू खान (वय 23), योगेश तात्याराम लवटे (वय 30), पांडुरंग कचरू नेंगुळे (वय 27, रा. आंबेठाण, ता. खेड), नवनाथ चंदर शीरकनवाड (वय 30, रा. ताथवडे) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

Pimpri : थेट पोलिसालाच दिली गुन्ह्यात अडकविण्याची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनगर (Gahunje) येथील एका किराणा दुकानातून आरोपी फुलताज खान याने बिस्कीट विकत घेतले. त्या बिस्किटांचे कमी पैसे दिल्याने आरोपींचा आपसात वाद झाला. आरोपींनी सार्वजनिक रोडवर जमाव जमवून शिवीगाळ व भांडण केले. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपींना समजावून सांगितले. तरीही आरोपी एकमेकांसोबत भांडण करत होते. याबाबत पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

spot_img
Latest news
Related news