Pimpri : थेट पोलिसालाच दिली गुन्ह्यात अडकविण्याची धमकी

एमपीसी न्यूज : रिक्षा चालकाने (Pimpri) रिक्षावर इ चलनची कारवाई का केली? तसेच बायकोशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल कऱण्याची धमकी देत शिवीगाळ केली. हा प्रकार बुधवारी (दि.21) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास पिंपरीतील साई चौकत घडला.

याप्रकरणी पोलिसांनी रिक्षा चालक आनंद सुरेश हिरेकर (वय 36 रा. पिंपरी) याला अटक केली असून त्याच्या पत्नी विरोधातही गुन्ह दाखल केला आहे. याप्रकऱणी पोलीस हवालदार वृषिकेत पांडुरंग पाटील (वय 45) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PCMC Breaking News : नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी तातडीने स्वीकारला पदभार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोपीच्या रिक्षाचे इ चलन काढले. याचा राग मनात धरून आरोपी व त्याच्या पत्नीने फिर्यादी यांचे (Pimpri) वरीष्ठ अधिकारी त्यांना समजावून सांगत असताना त्यानांच उलट तुम्ही माझ्या बायकोशी गैरवर्तन करत आहात म्हणून तुमचे पण नाव देतो म्हणत कारवाई न करण्यासाठी दबाव आणला व पोलिसांना शिवीगाळ केली. यावरून पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.