Pune News : अभया महिलांच्या हस्ते गणेशयाग

एमपीसी न्यूज  : गणेश जन्म सोहळ्याचे औचित्य साधून तावरे कॉलनीतील एकता मित्र मंडळ (ट्रस्ट) व शनी मारुती बालगणेश मंडळ येथे वंचित विकास संस्था व गणपती मंडळांच्या वतीने समाजातील एकल महिलांच्या अर्थात अभया महिलांच्या हस्ते गणेश पूजन (Pune News) गणेशयाग करण्यात आला. विधीवत गणेश पूजन, आरती, नवग्रह पूजा थाटात पार पडली. महिलांनी बनवलेले मोदक, तीर्थ, प्रसाद सर्वांना देण्यात आले. तेजस्विनी थिटे, मीनाक्षी नवले यांनी पुढाकार घेत या कार्यक्रमाचे आयोजन केले. तसेच अभया अभियानाविषयी माहिती दिली.

यावेळी उपस्थित महिलांशी वंचित विकास संस्थेच्या मीना कुर्लेकर आणि सुनीता जोगळेकर यांनी संवाद साधला. सर्व अभयांनी सकारात्मक पुढाकार घेऊन आजचा यज्ञ पार पाडल्याबद्दल अभया महिलांचे कौतूक करण्यात आले. आजचा हा अभयांचा गणेश याग समाजामध्ये एक महत्त्वाचा संदेश रूजवत आहे. महिलांमधील न्यूनगंड, एकटेपणाची व कमीपणाची भावना नष्ट करून, या महीला सर्वांसोबत सन्मानाने वावरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे, असे कुर्लेकर यांनी नमूद केले.

Pimpri News : नदी सुधारचा मार्ग मोकळा; 200 कोटींचे कर्जरोखे उभारण्यास शासनाची मान्यता

शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ येथे महाआरती करण्यात आली. कसबा संस्कार केंद्र येथे अभयाच्या हस्ते बोरन्हाण व हळदीकुंकू समारंभ झाला. श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठान, (Pune News) साईनाथ मित्र मंडळ ट्रस्ट बुधवार पेठ येथेही गणेश याग झाला. मोहननगर मित्र मंडळ, सदैव फाउंडेशन, सत्य फाउंडेशन यांसह विविध गणेश मंडळांनी केलेल्या गणेशयाग मध्ये 150 पेक्षा अधिक महिलांनी सहभाग नोंदवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.