Chakan : गौरव शहा यांचे निधन 

एमपीसी न्यूज – चाकण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते गौरव महेंद्र शहा ( वय – ३० ) यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्यावर चाकण येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या आकस्मित निधनाने चाकण परिसरावर शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.  दिवंगत पत्रकार महेंद्र शहा यांचे ते चिरंजीव तर युवा सामाजिक कार्यकर्ते मयूर शहा यांचे ते बंधू होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.