Chakan News : राहुल गोतारणे यांचे निधन

एमपीसी न्यूज : चाकण येथील भीमज्योत तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष राहुल गुलाब गोतारणे ( वय 45) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्यावर चाकण (Chakan News) येथील चक्रेश्वर मंदिर परिसरातील वैकुंठ स्मशानभूमीत आज सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी , कार्यकर्ते खूप मोठ्या संखेने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी , दोन मुले, भाऊ, बहिणी, चुलते असा मोठा परिवार आहे. पुणे जिल्हा कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्या कमलताई गोतारणे यांचे ते जेष्ठ पुत्र होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.