City Cup 2021 : जाएंटझ अ आणि स्निग्मय एफ.सी दुसऱ्या फेरीत

एमपीसी न्यूज –  जाएंटझ अ आणि स्निग्मय एफ.सी. संघांनी सहज विजयासह सिटी कप 2021 बाद फेरी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ही स्पर्धा पुण्यातील मोशी येथील सिटी स्पोर्टस अरेना येथे सुरु आहे.

स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी जाएंटझ अ संघाने दहा गोलच्या सामन्यात बोपोडी एफ.सी. संघाचा 7-3 असा पराभव केला. पूर्वार्धात अभिजित धनवडे (13वे, 30वे मिनिट)याच्या दोन गोलच्या जोरावर जाएंटझ अ संघाने मध्यंतराला 3-0 अशी आघाडी घेतली होती. तिसरा गोल कपिल पाचपिंडे याने 14व्या मिनिटाला केला.

उत्तरार्धात निशांतने गोल धडाका लावला होता. त्याने 43 व्या मिनिटाला वैयक्तिक पहिला आणि संघाचा चौथा गोल केला. त्यानंतर चार मिनिटांत त्याने आणखी दोन गोल केले. त्याने दुसरा गोल 70 व्या, तर तिसरा गोल 73 व्या मिनिटाला केला. विजयी संघाचा सातवा गोल अभिजीतने 45 व्या मिनिटाला केला. पराभूत बोपोडी एफ.सी. संघाकडून रॉनी रोझारियो (44वे), स्टिफन के. (47वे) आणि रोहित क्षिरसागरने 62 व्या मिनिटाला गोल केला.

दुसऱ्या सामन्यात स्निग्मन एफ.सी. संघाने इन्फंटस एफ. सी. संघाचा 5-0 असा पराभव केला. प्रतिक साबळे याने 14 आणि 68व्या मिनिटाला गोल केले. अन्य तीन गोल सुबोध लामा (41वे), सुमित भंडारी (58वे मिनिट) आणि प्रतिक पाटिल (66वे मिनिट) यांनी केले.

निकाल –

  • जाएटंझ अ 7 (अभिजित धनवडे 13वे, 30वे, कपिल पाचुपिंडे 14वे, निशांत एम. 43वे, 69वे, 70+3 वे मिनिट, अभिजित एम. 45वे मिनिट) वि.वि. बोपोडी एफ.सी. 3 (रॉनी रोझारियो 44वे, स्टिफन के. 47वे, रोहित क्षीरसागर 62वे मिनिट)
  • स्निग्मय एफ.सी. 5 (प्रतिक साबळे 14, 68वे मिनिट, सुबोध लामा 41वे, सुमित भंडारी 58वे, प्रतिक पाटिल 66वे मिनिट) वि.वि. इन्फंटस एफ.सी. – 0

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.