Girish Bapat : भाजपला तिसरा मोठा धक्का, खासदार गिरीश बापट यांचे निधन; बालेकिल्ल्याचा किल्लेदार हरपला!

एमपीसी न्यूज : पुण्यातून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Girish Bapat) आणि कसबा मतदारसंघातून आमदार मुक्ता टिळक यांचे नुकतेच निधन झाले असताना आता भाजपला तिसरा मोठा धक्का बसला असून भाजप नेते आणि खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे दीनानाथ मंगेशकर रूग्णालय जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी सांगितले होते. नुकतेच त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. आणि हा किल्ला घडवण्याचे कार्य गिरीश बापट यांनी केले होते.

Girish Bapat : एकदा पराभव झाल्याने त्याच मतदारसंघात सलग पाच वेळा निवडून येणारे आमदार – गिरिश बापट

गिरीश बापट (Girish Bapat) महाराष्ट्राच्या 13 व्या विधानसभेचे सदस्य होते. हे कसबा पेठ मतदारसंघातून निवडून गेले. गिरीश बापट यांची 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड झाली आहे.

त्यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे अशी माहिती जगदीश मुळीक यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.