Pandharinath Phadke : बैलगाडा शर्यतींचा गोल्डन मॅन हरपला; पंढरीनाथ फडके यांचे निधन

एमपीसी न्यूज : गोल्डन मॅन म्हणून ओळख (Pandharinath Phadke) असलेले तसेच प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरीनाथ फडके यांचे आज निधन झाले. आपल्या ऑफिसवरून घरी जाताना कारमध्येच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

PCMC : शाळा व्यवस्थापन समितीचा गुरुवारी मेळावा

ते पनवेल येथे राहत होते. महाराष्ट्रातील टॉपचा समजला जाणारा बादल बैल याने तब्बल 11 लाख रुपयांची शर्यत जिंकली होती. शर्यतीत जो बैल जिंकायचा कोणत्याही किंमतीत त्याला पंढरीनाथ विकत घ्यायचे. वडिलांमुळे लागलेली बैलगाडा शर्यतीची आवड त्यांनी कायम जपली. अंगावर भरपूर सोने, गाडीवर बसून फिरणे हे त्यांचे शौक असल्याने त्यांना गोल्डन मॅन म्हणून नाव पडले.

पंढरीनाथ यांच्या निधनाने बैलगाडा प्रेमींमध्ये शोकाकूल (Pandharinath Phadke) वातावरण आहे. त्यांच्या जाण्याने बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का बसला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.