Pune: ‘संवाद सुप्रियाताईंशी, प्रत्येक जनसामान्यांशी!’ 

एमपीसी न्यूज – लोकशाही राष्ट्रात लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य(Pune) नागरिक यांचा संपर्क निव्वळ निवडणुकीसाठी न राहता मतदारसंघाच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासासाठी वेळोवेळी झाला पाहिजे, या उद्देशाने प्रभागात ‘संवाद सुप्रियाताईंशी, प्रत्येक जनसामान्यांशी!’ हा उपक्रम आयोजित केला आहे.
या उपक्रमांतर्गत खासदर सुप्रिया सुळे  यांनी प्रभागातील श्रीराम सोसायटी (Pune)या ठिकाणी भेट देत नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील दुधाने उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या समस्या आणि सूचना ऐकून घेत भविष्यात त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचा शब्द दिला आहे.

श्रीराम सोसायटीने लोकसहभागातून भव्य हॉल व बॅडमिंटन हॉलची उभारणी केली आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी लोकसहभागातून संपन्न झालेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करत समाजकारणात नागरिकांनी सहभाग नोंदवला पाहिजे, असे मत व्यक्त केले. या उपक्रमामुळे खासदारांशी संवाद होत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. कर्वेनगर – वारजे प्रभागातील वारजे हा बारामती लोकसभा मतदारसंघात येत असून या अनुषंगाने प्रभागातील तिरुपती नगर सोसायटी या ठिकाणीही खासदार सुप्रिया सुळे यांनी नागरिकांशी संवाद साधला.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.