Pune : शाळेतच चांगले संस्कार घडतात – डॉ. नितीन करमळकर

एमपीसी  न्यूज -संस्कृत देवांची भाषा त्यातून वेद निर्माण झाले सगळ्यात चांगले संस्कार हे शाळेत होतात. विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धेत भाग घेतला पाहिजे तरच विद्यार्थी घडतात. हे तर स्पर्धेचे युग आहे.भाषांमधून बऱ्याच गोष्टींचे संवर्धन होत असते.भाषेच्या माध्यमातून आपण इतरांशी बोलत असतो त्यामुळे अनेक भाषा अवगत असणे ही काळाची गरज आहे. शाळेतच चांगले संस्कार घडतात,  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल येथे दादासाहेब एकबोटे आंतरशालेय संस्कृत पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सेक्रेटरी श्यामकांत देशमुख, सहकार्यवाह, नगरसेविका प्रा.ज्योत्स्ना एकबोटे,शाळा समिती अध्यक्ष व उपकार्यवाह चित्तरंजन कांबळे, नियामक मंडळाचे सदस्य नंदकिशोर एकबोटे,सहसचिव सुरेश तोडकर, समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, नियामक मंडळ सदस्य प्रमोद शिंदे, डॉ. निवेदिता एकबोटे उपकार्यवाह, शाळेचे व्हिजीटर उद्धव खरे, मृगाजा कुलकर्णी, पर्यवेक्षिका सीमा कुळधरण उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे म्हणाले की,आई-वडिलांच्या संस्कारातून विद्यार्थी घडत असतो.

विद्यार्थ्यांनो संस्कृत मंत्राच्या उच्चारणामुळे स्मरणशक्ती वाढते, बुद्धी तल्लख होते,वाणी शुद्ध व स्पष्ट होते.जगात सर्वत्र संस्कृत भाषेला चांगली मागणी आहे.त्यामुळे या भाषेचे अध्ययन-अध्यापन व्हायला हवे, लेखन ही प्रगती व संस्कृत चिंतन हे आपले उद्दिष्ट हवे.आपले जीवन संस्कृतनेच व्यापले आहे. तसेच संगणकीय प्रणालीवर संस्कृत भाषेचा प्रभाव आहे. प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता लकारे या प्रास्ताविकात म्हणाल्या की, संस्कृत भाषेचे महत्व ओळखून आंतरशालेय पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्याध्यापिका रोहिणी काळे यांनी पाहुण्यांचा परिचय केला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभांगी घेवडे,प्रज्ञा रायरीकर यांनी सहकार्य केले.जान्हवी दुर्गे या विद्यार्थ्यांनीने संस्कृत अथर्वशीर्ष सादर करून स्पर्धेची सुरुवात केली. सूत्रसंचालन सतीश लिंबेकर व आभार सुदक्षिणा गाडगीळ यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.