Google Map : आता ‘बिग बी’ दाखवणार वाट चुकलेल्यांना रस्ता…

Google Map: Now 'Big B' will guide the road to those who missed... मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार 'गुगल मॅप'वर आता अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकू येणार आहे.

एमपीसी न्यूज – हे शीर्षक वाचून चक्रावलात ना? पण हे खरंच आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आता गुगल मॅपच्या मदतीने नेटकऱ्यांना पत्ता शोधायला मदत करणार आहेत. महानायक अमिताभ सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, फोटो, व्हिडीओ, ट्विट्स यांच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात.

मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार ‘गुगल मॅप’वर आता अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकू येणार आहे. गुगल सध्या ऑडिओ फॉर्ममध्ये पत्ता सांगणाऱ्या अ‍ॅप्लिकेशनवर काम करत आहे. या अ‍ॅप्लिकेशनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे सॉफ्टवेअर असेल. या सॉफ्टवेअरच्या ऑडिओ फॉर्मला अमिताभ यांचा आवाज दिला जाणार आहे. या नव्या प्रकल्पावरुन बिग बी आणि गुगल यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरु आहे. तसेच गुगलने त्यांच्या आवाजासाठी कोट्यवधींचे मानधन देऊ केल्याचेही म्हटले जात आहे.

याआधी गुगल मॅपवर रस्ता दाखवणा-या महिलेच्या आवाजावरुन बरेच जोक्स लिहिले गेले. एकेकाळी अमिताभना अनाउन्समेंटचे काम नाकारले होते. पण त्याच आवाजाने पुढे लोकांवर अशी काही जबरदस्त मोहिनी घातली की तो खर्जातला आवाज हीच बिग बींची ओळख बनली. अभिनयाबरोबरच अमिताभ यांचा आवाज हा त्यांचा अ‍ॅसेट आहे. त्यामुळे इतका लोकप्रिय आणि देशवासीयांना ओळखीचा असलेला आवाज गुगलने वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.