Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची कोरोनावर मात; लवकरच केबीसीच्या मंचावर परतण्याचे संकेत

एमपीसी न्यूज – बॉलीवूडचे महानायाक अमिताभ बच्चन हे नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. सध्या बिग बी हे कौन बनेगा करोडपती 14 मुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपुर्वी अमिताभ यांना कोरानाची लागण झाली होती. त्यानंतर ते लवकर बरे व्हावे यासाठी सर्व चाहते प्रार्थना करीत होते. नुकताच त्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

अमिताभ बच्चन यांना 23 ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती. त्यांची कोरोना चाचणी पुन्हा पॉझिटिव्ह आल्याची माहिती व्टिटरच्या माध्यमातून दिली होती. नुकतीच माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया मागच्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानंतर आता त्यांनी स्वत: कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचे सांगितले आहे.

अमिताभ बच्चन हे नेहमीच विविध विषयांवर ब्लॅग लिहित असातात.नुकतंच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे की, अखेर कामावर परतलो. माझी कोरोना चाचणी काल रात्री निगेटिव्ह आली आहे. तुमच्या प्रार्थनांसाठी खरच खूप आभार. आयसोलेशनचे ते नऊ दिवस संपले. त्यांनी सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.