Pune : नवरदेव पोहोचले हेलिकॉप्टरमधून विवाहस्थळी

एमपीसी न्यूज – आपले लग्न विशेष आणि खास बनविण्यासाठी अनेक जण लग्नात वेगवेगळे ट्रेंड आणतात. आपला विवाह आकर्षक व्हावा यासाठी पुणे जिल्ह्यातील मावळ तालूक्यातील एका नवरदेवाने हेलिकॉप्टरने विवाहस्थळ गाठले. अशोक वाडेकर असे या नवरदेवाचे नाव.

_MPC_DIR_MPU_II

अशोक याचे लग्न मुळशी तालुक्यातील पूजा देवकर यांच्याशी लग्न ठरले होते. बुधवारी त्यांचा विवाह सोहळा हिंजवडी येथे पार पडणार होता. मावळ येथील डोणे गाव येथून त्यांच्या घरापासून वाजत गाजत हेलिपॅडच्या ठिकाणी रवाना झाले. तिथून ते हेलिकॉप्टरमध्ये बसून काल सकाळी साडेदहा वाजता डोणेगावमध्ये पोहोचले.

दरम्यान, गावक-यांना या आगळ्यावेगळ्या प्रकाराचे खूप आकर्षण असल्याने त्यांनी नवरदेवाला पाहण्यासाठी गर्दी केली होती.  त्यामुळे नवरदेव अशोक यांच्याभोवती अंगरक्षकही ठेवण्यात आले होते. अशोक हे एका शेतकरी कुटुंबातील आहेत. हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यासाठी प्रतितास 75 हजार रुपयांचा खर्च करण्यात आला.यामुळे संपूर्ण मावळमध्ये त्यांच्या विवाहाची जोरदार चर्चा रंगली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.