Suresh Raina : विश्वचषक संघात ‘हा’ खेळाडू असता तर 2019 चा विश्वचषक भारताने जिंकला असता – सुरेश रैना

Had there been this player in the World Cup squad, India would have won the 2019 World Cup.

एमपीसी न्यूज – 2019 च्या विश्वचषकात भारतीय संघात अंबाती रायडू असता तर भारत हा विश्वचषक जिंकू शकला असता असं मत माजी क्रिकेटपट्टू सुरेश रैना याने नोंदवलं. त्यावेळी अंबाती रायडूला चौथ्या क्रमांकावर खेळायला हवं होतं असं रैना म्हणाला.

अंबाती रायडू 2018 मध्ये यो-यो टेस्टमध्ये फेल झाला होता आणि इंग्लंड दौऱ्यावर जाऊ शकला नाही. 33 वर्षाचा सुरेश रैना म्हणाला, अंबाती रायडूचं टेस्टमध्ये फेल होणं आण त्याला संघात स्थान न मिळणं याने मी आनंदी नव्हतो.

अंबातीला फेल केल्यावर मला त्याच्या जागेवर संघात घेण्यात आलं होतं. त्यामुळे मला वाईट वाटत होतं.

अंबाती टेस्टमध्ये फेल झाल्यावर संघात एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं. अंबाती भारताच्या संघात चौथ्या क्रमांकाचा फलंदाज असायला हवा होता. कारण तो खूप मेहनत घेत होता.

त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली होती तेव्हा तेव्हा त्याने खूप चांगली कामगिरी केली होती. मात्र तरीही त्याला संघात स्थान मिळाले नव्हते, असं सुरेश रैना म्हणाला.

अंबातीला संघात स्थान न मिळल्यानं संघात विचित्र वातावरण झालं होतं. मीही 2018 चा इंग्लंड दौऱ्याचा आनंद घेऊ शकलो नाही. कारण त्याच्या जागेवर मला घेतल्याने मलाही वाईट वाटत होते, अशी भावना रैनाने व्यक्त केली.

अंबाती रायडू भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर सर्वोत्कृष्ट खेळाडू होता. जर तो भारतीय संघात असता तर भारत नक्कीच विश्व चषक जिंकू शकला असता, असं मत सुरेश रैनाने व्यक्त केलं.

2019 च्या एकदिवसीय विश्वकपसाठी अंबातीला भारतीय संघात स्थान मिळालं नव्हतं. इतकंच नाही तर संपूर्ण मालिकेत संघातील अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले, मात्र त्यानंतरही अंबातीला संधी दिली गेली नाही. यानंतर अंबाती रायडूने निवृत्ती घेतली. मात्र, काही दिवसांनी त्याने घरेलू क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.