BNR-HDR-TOP-Mobile

Hadapsar : लग्नास नकार दिल्याने तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

0 1,703
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – लग्नास नकार दिल्याने तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील हडपसर भागात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेखर तुपे (रा मांजरी बुद्रुक, महादेवनगर) असे आरोपीचे नाव आहे.

  • याबाबत पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील महादेवनगर भागात एका शाळेत मयत तरुणी ही कराटे क्लाससाठी जात होती. त्यावेळी तिची शेखर तुपे या तरुणीशी ओळख झाली. या ओळखीचे कालांतराने प्रेमात रूपांतर झाले. त्यानंतर तरुणीने लग्नासाठी आरोपीकडे विचारले असता त्याने लग्न करण्यास नकार दिला.

त्यामुळे तरुणीने घरातील किचनमध्ये गळफास घेतला.हि बाब लक्षात येताच तिला जवळील रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तसेच या प्रकरणातील आरोपी शेखर तुपे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत, असे सांगितले आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3