Moshi : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. ही घटना जून 2019 ते 24 फेब्रुवारी 2020 या कालावधीत घडली.

शुभम कांबळे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 15 वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या मोबाईलवरून पीडित मुलीच्या आईला वारंवार फोन केला. पीडित मुलगी आपल्याला आवडत असून तिच्यावर माझे प्रेम आहे. हो म्हणाली नाही तर माझ्या मोबाईल मधील तुझे फोटो वडिलांना दाखवीन’ अशी आरोपीने धमकी दिली. तसेच वेळोवेळी मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.