हिंदू जनजागृती समितीच्या वतीने शालेय विद्यार्थिनींचे आरोग्य शिबिर

एमपीसी न्यूज – पुण्यातील माळवाडी येथील विद्याश्रम शाळा येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने बुधवारी (दि.10) आरोग्य शिबिर घेण्यात आले.

मानवतावाद हा पत्रकारितेचा गाभा असायला हवा – विजय कुवळेकर

विद्यार्थिनींसाठी ‘मासिक पाळी संदर्भात घ्यायची काळजी’ या विषयावर मार्गदर्शन घेण्यात आले. याविषयी डॉ. मुक्ता लोटलीकर यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ 76 विद्यार्थिनींनी घेतला. या मार्गदर्शनामध्ये मुलींनी आरोग्याची काळजी कशी घ्यायची, तसेच आहार आणि व्यायाम याचेही महत्त्व सांगितले. तसेच मुलींच्या प्रश्नांना डॉ. मुक्ता लोटलीकर यांनी समर्पक उत्तरेही दिली.

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सामाजिक जाणीव जोपासली जावी आणि समाजाला त्याचा अधिकाधिक लाभ व्हावा या उद्देशाने आरोग्य तपासणी,मंदीर स्वच्छता,गरजूंना अन्नदान,शालेय साहित्य वाटप अश्या प्रकारचे विविध उपक्रम नियमितपणे घेतले जातात. मिनल मनमाडकर, प्रीती कुलकर्णी यांनी आयोजनात सहभाग घेतला आणि उपक्रम यशस्वी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.