Amit Gorkhe : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सांगली दौरा समन्वय प्रमुखपदी अमित गोरखे

एमपीसी न्यूज : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राज्यभर संघटनात्मक दौरे करीत आहेत. त्याच दौऱ्यातील सांगली येथे 12 व 13 नोव्हेंबर (शनिवार व रविवार) रोजी सांगली शहर व ग्रामीण भागात त्यांचा नियोजित दौरा पक्षाकडून नियोजित केला असून त्या दौऱ्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अमित गोरखे (Amit Gorkhe) यांच्याकडे दिलेली आहे.

अमित गोरखे (Amit Gorkhe) यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी सांगितले, पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा हा जिल्हा संघटनात्मक दौरा असून त्या दरम्यान विविध सामाजिक मेळावे, संघटनात्मक बैठका, बूथ सक्षमीकरण, शहर व ग्रामीण कोअर कमिटीची बैठक, सोशल मीडिया बूथ कमिटीची बैठक, नवीन मतदार नोंदणी अभियान, युवा वॉरियर्स शाखा उद्घाटन, धन्यवाद मोदीजी अभियान व विविध समाजांचे मेळावे या दौऱ्यात नियोजित केले आहे.

ENG vs PAK : पाकिस्तानवरच्या रोमांचक विजयासह इंग्लडने मिळवले दुसऱ्यांदा जेतेपद

दौरा समन्वयक प्रमुख म्हणून त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन प्रत्येक ठिकाणाची पाहणी तथा कार्यक्रमाचे नियोजन या संदर्भातील मी माहिती घेतली आहे,अत्यंत चोख व व्यवस्थित नियोजन भारतीय जनता पार्टी सांगली शहर व ग्रामीणच्या वतीने करण्यात आलेले आहे, असे त्यांनी सांगितले.

सांगली शहर जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे व सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख तसेच आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर व इतर जिल्हा पदाधिकारी यांच्याशी संपर्क करून दौरा समन्वय नियोजित करण्यात आला आहे, अशी माहिती गोरखे (Amit Gorkhe) यांनी दिली.


तसेच सांगली भेटी दरम्यान संभाजी भिडे गुरुजी यांची सकाळी जाऊन भेट घेतली, त्यांनी आवर्जून कै अंकुशराव लांडगे यांच्या कुटुंबाची विचारणा केली व अंकुशराव आणि त्यांचे असलेले सलोख्याचे संबंध याविषयी आठवणींना उजाळा दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.