Pimpri : अमित गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य पुस्तक प्रदर्शन

एमपीसी न्यूज – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे (Pimpri ) माजी अध्यक्ष तथा भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात उद्या (शनिवारी) आणि रविवारी प्रथमच “भव्य पुस्तक प्रदर्शन” आयोजित करण्यात आले आहे.

नोव्हेल शिक्षण संस्था, कलारंग कला संस्था, पिंपरी-चिंचवड ऑलंपिक असोसिएशन य़ांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड, अखिल भारतीय साहित्य परिषद महाराष्ट्र, भारतीय विचार साधना महाराष्ट्र, कामगार साहित्य परिषद, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ, पिंपरी चिंचवड, बंधूता प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड, मातंग साहित्य परिषद, समरसता साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड साहित्य मंच यांच्या विशेष सहकार्याने  हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

Railway News : पुणे रेल्वे विभागाची ऑक्टोबर महिन्यात दमदार कामगिरी; फुकट्या प्रवाशांकडून 2.66 कोटींचा दंड वसूल

चिंचवड येथील बर्ड व्हॅली जवळ नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल ग्राऊंडवर शनिवार 4 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत हे प्रदर्शन राहणार आहे. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी 10 ते 8 वाजेपर्यंत पुस्तक प्रदर्शन सर्वासाठी खुले राहणार आहे.

वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ न आणता एक पुस्तक आणावे. या प्रदर्शनात पुस्तक विक्रीतून मिळणारा निधी अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्यात येणार आहे. या अभिनव उपक्रमाचा भाग बनावे व या कार्यक्रमास उपस्थित राहून वाचन संस्कृतीला प्रेरणा द्यावी, असे आवाहन माजी नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी (Pimpri ) केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.