Talegaon Dabhade : तळेगाव मधील आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – जिल्हा परिषद, पुणे व मायमर वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञ डॉक्टर यांच्या सहकार्याने सर्वरोग शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. बुधवारी (दि. 23) पार पडलेल्या शिबिरात सुमारे अडीचशे नागरिकांची तपासणी करण्यात आली.

सुभाष चौक, तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र (सरकारी दवाखाना) येथे आरोग्य शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे संस्थापक अध्यक्ष रो विलास काळोखे यांच्या हस्ते, रो किरण ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली व रो तानाजी मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

शिबिरात मेडिसिन, हृदयरोग, उच्चरक्तदाब, मधुमेह, दमा, सर्जरी, स्त्रीरोग, अस्थिरोग, बालरोग चिकित्सा, नेत्ररोग, नाक-कान घसा, त्वचारोग,दंतचिकित्सा संबंधित 250 हून अधिक रुग्णांची तपासणी, चाचण्या व औषधोपचार मोफत करण्यात आले.

शिबिराचे नियोजन डॉ उमेश गुट्टे, डॉ राजेंद्र मोहिते, डॉ दिनेश महालिंगे, डॉ शिल्पा बागलकोटकर, डॉ गायत्री मोरे , आरोग्य सेविका हिंगणे सिस्टर व प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगांव दाभाडे व मायमर वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व सहकारी यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.